
MAHARASHTRA DGIPR
@mahadgipr
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
t.me/MahaDG
ID: 2862278167
https://dgipr.maharashtra.gov.in 18-10-2014 09:19:38
68,68K Tweet
315,315K Followers
80 Following

📍कोल्हापूर बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना(मौनीनगर) येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन संपन्न झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



मुंबई शहर व उपनगरातील नालेसफाईची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले


देशाचे नूतन सरन्यायाधीश मा. न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी सरन्यायाधीश गवई यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
