पुण्यात १९१० पासून असलेली वैद्य उपहार गृह, पुणे ही मिसळ खूप दिवसांनी खाल्ली. इथे गेल्यावर मिसळ, शेवचिवडा, कैरीडाळ, बटाटा भजी असे पदार्थ खाऊन पहा.
#मिसळ #पुणे #Pune #रविवार
Cultivation of mind should be the ultimate aim of human existence - Dr. Babasaheb Ambedkar
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#AmbedkarJayanti2025
असं रस्त्यावर तंबाखू मळत जाऊ नका म्हणावे आबांना.
जनरली, तंबाखू खाताना कोणी दिसला की लोकं फक्त दोन कारणांनी थांबतात...
१. तंबाखू मागायला
२. चुना मागायला
#माणुसकी
पुणे शहर वाहतूक पोलीसांना नेमकं काय अपेक्षित आहे? तरुणांची पिळवणूक करुन काय मिळतंय?
काही वेळापूर्वी सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली स्वप्नील जाधव या दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवण्यात आलं. हेल्मेट, लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न सगळं चेक केलं क्लीअर होतं. प्रमोद कोकणे
#पुणे
रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न, रिक्षाचलकांना पांढरा शर्ट, खाकी पँट असा गणवेश परिधान करणे आवश्यक. गणवेश, ओळखपत्र बंधनकारक अन्यथा कारवाई होणार असा इशारा आरटीओने दिला आहे.
#pune
#punenews
चालताना, पळताना, ट्रेनमधून, बसमधून, रिक्षातून प्रवास करताना, जिममधे, गाडी चालवताना जिकडे बघू तिकडे -
“कानात हेडफोन्स लावून गाणी ऐकताना अनेक माणसं दिसतात.”
त्यांच जगच पुर्ण वेगळं वाटतं. माणसात असूनही ती अलिप्त असतात, त्यांच्याच दुनियेत.
कुणी काय करावं हा फार वैयक्तिक मुद्दा
१/५