सहज आठवलं, मागे एका मंत्रीमहोदयांकडे शिक्षण आणि पशुसंवर्धन ही दोन्ही खाती होती. पण त्यांनी कधी गोंधळून पशुसंवर्धन खात्याचे निर्णय शिक्षण खात्यासाठी राबवले नाही.
पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.
काल वडिलांचा ७५ वा वाढदिवस. अण्णांच्या पंचाहत्तरी निमित्त पाडळशिंगीला शेतात ७५ झाडं लावली. हाच शुभमुहुर्त म्हणून बीडला रामगडावर नविन सह्याद्री देवराईचं उद्घाटन केलं आणि ७५ दुर्मिळ झाडं लावली. सह्याद्री देवराईकडून रामगडला येत्या दोन महिन्यात पाच हजार नविन झाडं लावणार आहोत.
भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो .
भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो.
भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं.
गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.