Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile
Maharashtra State Excise

@excise_state

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग

18002339999 - तक्रार/complaint

ID: 1591382006264315904

calendar_today12-11-2022 10:47:02

33 Tweet

412 Followers

3 Following

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

धन्यवाद, लोकांनी एकत्र येऊन अशा कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद स्थानिक पातळीवर द्यावी. एक सुसज्य नागरिक म्हणूण आपले कर्तव्य आहे की कुठल्याही घटनेची माहिती महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police तसेच मुंबई पोलीस - Mumbai Police ह्यांना त्वरीत सांगावी.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

पालघर आणि नाशिक जिल्ह्यात दादरा नगर हवेली आणि सिल्व्हासा येथून अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची खबर आमच्या विभागाला मिळाली आहे. या संदर्भात पालघर व नाशिक पोलिस विभागाशी संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

ज्या प्रकरणांमध्ये ५० लिटरपेक्षा जास्त दारू जप्त केली जाते, पोलीस उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम ३४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करतात. या कलमामुळे आरोपींना पोलीस ठाण्यातून जामीन मिळत नाही आणि न्यायालयही कडक वागते. पर राज्यातली अवैध दारु तस्करी संबंधात ३ लाख रुपये दंड व २ वर्ष तुरुंग

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

नोंदणीकृत आणि कायदेशीर उत्पादकांच्या मंजूर आणि नियमन केलेल्या उत्पादन प्रक्रियेच्या बाहेर 'अवैध' अल्कोहोल बेकायदेशीरपणे तयार केले जाते. हे मोठ्या प्रमाणात अनब्रँडेड आहे आणि उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणाऱ्या मानकांचे पालन करत नाही.

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

वसा दिला स्वराज्याचा, घडविले त्याचे सुराज्य, राखण्या हे दान श्रेष्ठ, आहोत आम्ही कायम सज्ज. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #जाणता_राजा #शिवजयंती

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

महाराजांचा गौरवशाली इतिहास आज आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर त्यांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता

महाराजांचा गौरवशाली इतिहास आज आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर त्यांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम! #पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम!

#पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

वसई ते डहाणू किनारपट्टी भागात सिल्व्हासा येथून अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची खबर आमच्या विभागाला मिळाली आहे. या संदर्भात वसई - विरार व पालघर पोलिस विभागाशी संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना शतः शतः नमन! #पोलीस_स्मृती_दिन

पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना शतः शतः नमन!

#पोलीस_स्मृती_दिन
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

जागरूक नागरिक (प्रमोद चौधरी ) ठाणे शहर पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळशेवाडी पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

तक्रारींची वेळीच दखल घेण्यासाठी विभागाने स्वत:चे सुविधा पोर्टल ही विकसित केले आहे. excisesuvidha.mahaonline.gov.in हे संकेतस्थळ असून विभागाला अवैध मद्य विक्रीसंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी या सुविधा पोर्टलच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांना पाठविल्या जातात.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

कलम 65: अवैधरित्या दारूचे उत्पादन, विक्री, आयात, निर्यात किंवा वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 50,000 रुपये दंड किंवा जप्त केलेल्या दारूच्या किंमतीच्या चौपट दंड (यापैकी जे जास्त असेल) ठोठावला जाऊ शकतो.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री: परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विकणे हा गुन्हा आहे. यासाठी 25,000 ते 30,000 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी अटक आणि न्यायालयीन कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शिक्षा किंवा जामीन याचा निर्णय न्यायाधीश घेतात.

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

मोटर वाहन कायदा, 2019 नुसार, मद्यपान करून वाहन चालवणे हा फौजदारी गुन्हा आहे. BA अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम/100 मिलीपेक्षा जास्त आढळल्यास 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंड (पहिला गुन्हा) किंवा 2 वर्षांपर्यंत कारावास आणि 15,000 रुपये दंड (पुनरावृत्ती) होऊ शकतो

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

अवैध दारू विक्रीची तक्रार टोल-फ्री क्रमांक 18008333333, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8422001133 किंवा ईमेल [email protected] वर करता येते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते

Maharashtra State Excise (@excise_state) 's Twitter Profile Photo

आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणतीही तक्रार, तिचा विषय काहीही असो, ती गुप्त ठेवा आणि ती तक्रार नियंत्रण विभागाकडे पाठवा. तुमची माहिती गोपनीय ठेवा आणि या प्रकरणात तक्रारीवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भरारी पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या कारवाईत एका वाहनासह सुमारे ६४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त #राज्यउत्पादनशुल्क #MaharashtraStateExcise #Thane Maharashtra State Excise

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भरारी पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. 

या कारवाईत एका वाहनासह सुमारे ६४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 

#राज्यउत्पादनशुल्क #MaharashtraStateExcise #Thane
<a href="/excise_state/">Maharashtra State Excise</a>